वृत्त क्र. 237
नांदेड जिल्ह्यातील 17 वाळू गटांना
पर्यावरण अनुमती
सात गाळ मिश्रित वाळूगटातून गाळ काढण्यासाठी परवानगी
नांदेड दि. 13 : - नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्हयात एकूण 24 वाळू डेपो प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये बिलोली, देगलुर, माहुर, हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील 17 वाळू डेपो हे नियमित वाळू डेपोना पर्यावरण अनुमती प्रदान करण्यात आली आहे. तर उर्वरित 7 वाळू डेपो नांदेड व लोहा तालुक्यातील गाळमिश्रीत वाळू डेपो आहेत. या गाळमिश्रीत वाळू डेपोमधुन गाळ काढण्यासाठी विशेष बाब म्हणुन यंत्राच्या सहायाने परवानगी देण्यात आली आहे.
पर्यावरण अनुमती प्राप्त नियमित वाळू डेपो
बिलोली तालुक्यातील येसगी येथील वाळू
डेपोच्या ठिकाणाशी संलग्न असलेले रेतीघाट येसगी, गंजगाव, कार्ला बु., तर नागणी वाळू डेपोच्या ठिकाणी नागणी व माचनुर, देगलूर तालुक्यातील तमलुर या वाळू डेपोच्या ठिकाणाशी
संलग्न असलेले रेतीघाट तमलुर, मेद्दनकल्लुर
तर शेवाळा डेपोच्या ठिकाणी शेवाळा, शेळगांव हे
रेतीघाट आहेत. तर हदगाव तालुक्यातील बेलमंडळ वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट
गोर्लेगांव, बाभळी, बनचिंचोली, बेलमंडळ, गुरफळी हे आहेत. बिलोली तालुक्यातील माचनुर डेपोशी
संलग्न माचनुर रेतीघाट आहे. बिलोली तालुक्यातील सगरोळी 1 वाळू डेपोशी संलग्न सगरोळी
रेतीघाट तर गंजगाव वाळू डेपोच्या ठिकाणाशी संलग्न गंजगाव व कार्ला बु., माहूर तालुक्यातील केरोळी वाळू डेपोशी संलग्न असलेले
रेतीघाट टाकळी, लांजी तर कोळी
बे वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट सायफळ हे आहे. बिलोली तालुक्यातील बोळेगाव
वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट बोळेगाव, येसगी तर
हुनगुंदा वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट हुनगुंदा, माचनुर हे आहेत. सगरोळी-2 वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट सगरोळी, बोळेगाव हे आहेत. तर देगलुर तालुक्यातील शेखापुर वाळू
डेपोशी संलग्न रेतीघाट शेखापुर, शेळगांव हे
आहेत. हिमायतनगर तालुक्यातील विरसणी वाळू डेपोच्या ठिकाणाशी संलग्न असलेले रेतीघाट
विरसणी, पिंपरी, कामारी, दिघी, घारापुर, रेणापुर हे
आहेत. तर उमरी तालुक्यातील बळेगाव वाळू डेपोशी संलग्न बळेगाव रेतीघाट आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली ज. वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट डोलारी, बुंदली बे.कौठा, धानोरा ज.
पळसपुर हे रेतीघाट आहेत.
गाळ मिश्रित डेपो
नांदेड तालुक्यातील वाघी वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट रहाटी बु. , सोमेश्वर, जैतापुर, थुगांव, हस्सापुर, कोटीतीर्थ, बोरगांव तेलंग हे आहेत. खुपसरवाडी वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट वाहेगांव, भनगी, गंगाबेट, असर्जन, विष्णुपूरी, मार्कंड, पिंपळगांव मि., कौठा हे आहेत. भायेगाव वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट भायेगांव, राहेगांव, नागापुर, पुणेगांव, ब्राम्हणवाडा, त्रिकुट, बोंढार तर्फे हवेली, सिद्धनाथ, वांगी, किकी हे आहेत. लोहा तालुक्यातील बेट सांगवी वाळू डेपोशी संलग्न बेटसांगवी, शेवडी हे रेतीघाट तर येळी वाळू डेपोशी संलग्न असलेले येळी रेतीघाट, पेनुर वाळू डेपोत पेनुर तर मारतळा वाळू डेपोत कौडगांव या रेतीघाटाचा समावेश आहे.
या रेतीघाटावर गाळ काढण्यासाठी यंत्राच्या
सहाय्याने विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. या वाळू गटाव्यतिरिक्त
इतरत्र ठिकाणावरुन गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी व मन्याड
या नदीपात्रातुन उत्खनन होत असल्यास तसा प्रकारची रितसर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment