Tuesday, March 12, 2024

  वृत्त क्र. 233

डाक विमाधारक वारसाच्या पत्नीला

12 लाख 14 हजार रुपयाचा धनादेश वितरीत

 

नांदेड दि. 12 :- डाक विमा ही सरकारी विमा योजना असून सर्व सामान्यांना कमी हफ्त्यात अधिक बोनस देणारी कल्याणकारी विमा योजना आहे. सर्व सामान्यांना त्यांच्या कुटूंबाच्या सुरक्षिततेच्या हमीसाठी डाक जीवन विमा घेण्याचे आवाहन अधीक्षक राजीव पालेकर यांनी केले.

 

नांदेड येथील मयत रोहीत राजेश्वर बच्चेवार विक्रीकर निरीक्षक नांदेड यांनी भारतीय डाक विभागाची दहा लाख रुपयाची डाक जीवन विमा संतोष पॉलीसी तीन वर्षांपूर्वी घेतली होती. जानेवारी 2024 मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी डाक जीवन विमा पॉलीसी घेतल्यामुळे त्यांना डाक विभागाचे अधीक्षक राजीव पालेकर  यांच्या हस्ते 12 लाख 14 हजार रुपयाचा धनादेश वारसाची पत्नी श्रीमती रागिणी कमठाणे यांना 11 मार्च 2024 रोजी सुपूर्द करण्यात आला.

 0000  

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1161   राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, ...