Wednesday, June 9, 2021

 

हमीभावाने चणा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 9 :- किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत हंगाम 2020-21 मध्ये हमीभावाने चणा खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, कंधार, लोहा, किनवट (गणेशपूर) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणीस 18 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.    

मार्च-2021 मध्ये कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कडक निर्बंधामुळे काही शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. ज्या शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे नोंदणी करता आली नाही व त्यामूळे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेता आला नाही, अशा शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी व हमीभावाचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी  18 जून र्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...