Tuesday, May 18, 2021

 

       डोसच्या उपलब्धतेनुसार कमी-अधिक प्रमाणात

   जिल्ह्यातील सर्व केंद्रांना लसीचे वाटप  

नांदेड (जिमाका) दि. 18 :- वय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचा दुसरा डोस जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरुप वाटप करण्यात आला असून नागरिकांनी डोसच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्रांवर पोहचावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दिनांक 19 मे रोजी पुढीलप्रमाणे केंद्रनिहाय डोसेसची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, जंगमवाडी, कौठा, सिडको या 7 केंद्रावर कोविशिल्डचे शंभर डोस प्रत्येकी देण्यात आले. शहरी दवाखाना जंगमवाडी या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 100 डोस व श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालयात कोव्हॅक्सिनचे 70 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, उमरी, नायगाव येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय लोहा, मुदखेड, बारड येथे कोविशिल्डचे 90 डोस, उपजिल्हा रुग्णालय देगलूर कोव्हॅक्सिनचे 20 डोस, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे कोव्हॅक्सिनेच 30 डोस, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे कोव्हॅक्सिनचे 80 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सिनचे 80 डोस, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (एकुण 67) येथे कोविशिल्डचे प्रत्येकी 100 डोस याप्रमाणात लसीची उपलब्धता करुन दिली आहे.

 

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस घेणे वैज्ञानिकांनी अधिक हितावह असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.  

0000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...