Tuesday, March 22, 2022

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत

प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी गावपातळीवर विशेष कॅम्पचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीचे काम 25 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी गाव पातळीवर कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांचे लाभ थांबलेले आहेत अशा अर्जदारांनी  या कॅम्पमध्ये सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन डाटा दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

सदर डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण करुन पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांचे परिपत्रक दि. 4.2.2019 नुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कुटूंबनिहाय प्रति वर्ष रुपये सहा हजार इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत विविध प्रकारची डाटा दुरुस्ती असून त्याचा तालुकानिहाय तपशील याप्रमाणे आहे. मुखेड-2 हजार 537, देगलूर- 2 हजार 87, किनवट-2 हजार 56, लोहा-2 हजार 56, लोहा- 2 हजार 26, नायगाव- 1 हजार 910, भोकर-1 हजार 782, कंधार- 1 हजार 688, उमरी- 1 हजार 584, हिमायतनगर -1 हजार 443, नांदेड-1 हजार 437, हदगाव- 1 हजार 253, बिलोली-1 हजार 223, मुदखेड-1 हजार 34, माहूर-985, अर्धापूर-873, धर्माबाद-846 असे एकूण जिल्ह्यात तालुकानिहाय 24 हजार 764 डाटा दुरुस्ती आहेत. तरी या कॅम्पमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांनी आपल्या प्रलंबित अर्जाचा डाटा दुरुस्तीचे काम करुन सुरळीत लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...