वृत्त क्र. 463
पिक विमा भरण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
नांदेड (जिमाका) दि. 31 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यत मुदत होती. परंतु शेतकऱ्यांना पिक विमा भरताना पोर्टलवर येत असलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने 3 ऑगस्ट 2023 पर्यत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही त्यांनी 3 ऑगस्टपर्यत पिक विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment