Friday, August 10, 2018


कापूस, सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी संदेश देण्यात येत आहे.
प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 टक्के ए एफ 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे. सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी कामगंध सापळे लावा आणि निरीक्षण करा. तसेच प्रोफेनोफॉस 50 ईसी 25 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

सामाजिक न्याय दिनानिमित्त गुरुवारी समता दिंडीचे आयोजन विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन   नांदेड, दि. 23 जून :-राज्यात सामाजिक...