दिव्यांग मतदार
जनजागृतीसाठी
"माझं मत माझा
स्वाभिमान" हे पथनाट्य सादर
नांदेड, दि. 3 :- 17 व्या लोकसभा
सार्वत्रीक निवडणुक 2019 मतदान प्रक्रीयेतील सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी 86 उत्तर नांदेड मतदार
संघात दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम सात्यत्याने चालु आहेत. या कार्यक्रमांतर्गत पुनश्च 2 एप्रिल 2019 रोजी कामठा (बू.) येथील जिल्हा परिषद शाळा येथे दिव्यांग
मतदारांसाठी "माझं मत माझा स्वाभिमान" हे पथनाट्य सादर केले.
"माझं मत माझा स्वाभिमान" या पथनाट्याद्वारे लोकशाहीतील प्रत्येकाच्या
मताचे महत्व तसेच दिव्यांगासाठी निवडणुक विभागाद्वारे मतदान केंद्रावर पुरविण्यात
येणा-या सोयी सुविधांबाबत मतदारांचे
प्रबोधन करण्यात आले.
यावेळी संबंधीत मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील दिव्यांग मतदारांनी, नागरिक व
विद्यार्थी यांनी उपस्थित राहून पथनाट्यास उत्स्पूर्तपणे प्रतीसाद दिला. या
कार्यक्रमाप्रसंगी कामठा (बू.) येथील सहशिक्षक शेख हमीद पाशा इब्राहीम यांनी आपले
मनोगत व्यक्त करुन निवडणूक विभागाने
केलेल्या जनजागृती बद्दल आभार व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाची
प्रस्तावना प्रा. डॉ. महेश पाटील यांनी केली.
या कार्यक्रमासाठी
विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरज
मंत्री, मारोती कदम, केदार जोशी, कर्णधार मगर, चैतन्य अर्जुने व
रुषीकेश यादव यांनी पथनाट्य कलाकार म्हणून आपला सहभाग नोंदवला.
सहय्यक निवडणूक
अधिकारी श्रीमती.
अनुराधा ढालकरी व नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कक्षाचे प्रमुख
प्रा.डॅा. अशेाक सिद्धेवाड, प्रा. डॅा. महेश पाटील कार्लेकर, प्रा. डॅा. सुग्रीव
फड, प्रा. डॅा. दत्ता मेहत्रे दिव्यांग मतदारांचे मतदाणात 100 टक्के सहभागी होण्याच्या
दृष्टीकोणातुन विशेष प्रयत्न करत आहेत.
0000
No comments:
Post a Comment