Friday, October 25, 2019


शेतीशाळेत किड व्यवस्थापनेची माहिती 
नांदेड, दि. 25 :- पिंपळकौठा मगरे येथे नुकतेच क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळेचा शेतीदिनाचे आयोजन सरदार गुरुजी यांच्या शेतात करण्यात आले होते. 
या शेतीदिनास ‍जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी आर.बी.चलवदे, मुदखेडचे तालुका कृषी अधीकारी आर.एन.शर्मा, आकाशवाणीचे गणेश धोबे, कृषी पर्यवेक्षक गणेश वाघोळे, कृषी सहाय्यक श्रीमती जे.ओ.येरावाड, ए.एस.मोरे, कृषी सहाय्यक आर.के.कपाटे, शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थीत होते.
            यावेळी  माधव पवार यांनी शेतीशाळेच्या वर्गामध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन घेतलेल्या किडीचे निरिक्षण प्रत्यक्ष सोयाबीनवरील  किडीची ओळख, त्यांचे चित्रीकरण, सादरीकरण याबद्दलची माहिती दिली. गंगाधर मगरे यांनी त्यांचे शेतीशाळेतील वर्गाचे अनुभव कथन करताना सोयाबिन पिकामध्ये कामगंध सापळयाचे किडी ओळखताना व नियंत्रण करताना महत्व सांगीतले. यात त्यांनी कामगंध सापळे एकरी दोन वापरुन सलग तिन दिवस आठ ते दहा नर पतंग सापळयामध्ये आढळुन आल्यास ती किड आर्थीक नुकसान पातळी ओलांडत आहे. पिकास नुकसान करत आहे असा अंदाज बांधुन पिक व्यवस्थापण करणे गरजेचे आहे सांगितले.
            सरदार गुरुजी यांनी 5 टक्के निंबोळी अर्क कसे तयार करावे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षीक करुन दाखविले. यामध्ये उन्हाळयात जमा केलेल्या कडुनिंबाच्या निंबोळया गोळा करुन त्या स्वच्छ करुन 5 किलो निंबोळया बारीक कुटुन घेवुन एका कपडयात बांधुन 10 लिटर पाण्यात 24 तास भीजवुन सकाळी पुर्ण द्रावण पिळुन घेवुन 90 लिटर पाण्यात मिसळावे असे सांगीतले. या शेतीदिनात मुख्य प्रवर्तक गणेश वाघोळे यांनी किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी व संरक्षक किटचे महत्व व प्रात्यक्षीक करुन दाखविले.
            या शेतीदिनास शेतकऱ्यांशी संवाद साधताना आर.बी.चलवदे म्हणाले या शेतीशाळेत आलेला अनुभव शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना सांगावा. तसेच रब्बी हंगामात या गोष्टीचा जास्ती जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री. शर्मा यांनी रब्बी हंगामात हरभरा पिक पेरणी बीबीएफ यंत्राव्दारे व बिज प्रक्रीया करुन करावी तसेच हरभरा पिकात तुषार सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन केले.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...