Friday, October 25, 2019


बारावी परीक्षेचे ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
नांदेड, दि. 25 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परिक्षेच्या शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची अर्ज Saral Database वरुन ऑनलाईन पद्धतीने 3 ते 23 ऑक्टोंबर 2019 तसेच व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream) व सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्ज नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने 24 ते 31 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत व विलंब शुल्कासह 1 ते 8 नोव्हेंबर 2019 या कालावधीत भरावयाची होती. परंतू अर्ज भरताना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येत असून या मुदतीवाढीच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. त्याचा तपशील पुढीप्रमाणे आहे.
नियमित शुल्कासह (उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची अर्ज Saral Database वरुन आणि व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream) व सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या मुदतवाढीच्या ताराखा) गुरुवार 3 ऑक्टोंबर 2019 ते शुक्रवार 15 नोव्हेंबर 2019 (विलंब शुल्कासह शनिवार 16 नोव्हेंबर 2019 ते सोमवार 25 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत). उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाउनलोड करुन बॅकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा शुक्रवार 1 ते 26 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहील.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व Pre-list जमा करावयाची तारीख- गुरुवार 28 नोव्हेंबर 2019 आहे. अर्ज भरावयाच्या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी Pre-list Print करुन विद्यार्थ्यांमार्फत अर्जातील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी व विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर सदर Pre-list चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाहा / कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांची अर्ज Saral Database वरुन सेव्ह होत नसल्यास त्यांनी उपरोक्त दिलेल्या मुदतीत All Application च्या Link वरुन अर्ज भरावयाची आहेत.
सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्य मुदतीतच संबंधीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारेच भरण्यात यावेत, असे आवाहन डॉ. अशोक भोसले सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...