पदवीधर व शिक्षकसंघाच्या मतदार
याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम
दावे हरकती स्विकारण्याची 6 नोव्हेंबर अंतिम मुदत
नांदेड दि. 25 :- पदवीधर व शिक्षकसंघाच्या मतदार याद्या नव्याने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर (Qualifying
Date) आधारीत तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नांदेड
तालुक्यातील 86 नांदेड उत्तर व 87 नांदेड
दक्षिण मतदारसंघात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी नव्याने तयार
करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुनरिक्षणाचे टप्पे व कालावधी पुढील प्रमाणे राहील. नमूना 18 किंवा 19 व्दारे दावे व
हरकती स्वीनकारण्याचा अंतिम दिनांक बुधवार 6 नोव्हेंबर 2019
आहे. हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई मंगळवार 19
नोव्हेंबर 2019. प्रारुप मतदार यादयांची
प्रसिध्दी शनिवार 23 नोव्हेंबर 2019 ते
सोमवार 9 डिसेंबर 2019 आहे. दावे व
हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी गुरुवार 26 डिसेंबर 2019
असून मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2019 होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार नांदेड तालुक्यातील
पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्व्ये
पदवीधर व शिक्षक संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्यासाठी जाहीर सूचना
प्रसिध्द करण्यात येत आहे. या प्रसिध्दी पत्रकात नमूद दिनांकापर्यंत सर्व पदवीधर व
शिक्षक मतदारांनी आपले फॉर्म तहसिल कार्यालय नांदेड येथे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी
केले आहे.
0000
No comments:
Post a Comment