औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघ
मतदार यादीत नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड,
दि. 25 :- मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31
(4) चे अनुरोधाने मतदार नोंदणी अधिकारी, 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार
नोंदणीसाठी पात्र असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी मतदार
नोंदणी नियम 1960 मधील नमुना 18 अन्वये अर्ज मागविण्याबाबत 1 ऑक्टोंबर 2019 रोजी
वर्तमानपत्रात मतदार नोंदणी नियम 1960 ला जोडलेला नमुना 18 मध्ये आणि सदर
नोटीसच्या दुसऱ्या अनुसूचिमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्व
पात्र व्यक्तींनी यापूर्वी अर्ज केले नसल्यास त्यांनी 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी
नमुना 18 मध्ये अर्ज सादर करु शकतील. हा तपशील विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद
यांचे अधिकृत संकेतस्थळावर https://aurangabad.gov.in/notification-panel/ वर उपलब्ध आहे, असे आवाहन
करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment