Friday, August 9, 2019

गणेश मंडळांना वर्गणीसाठी
परवाना घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 9 :- गणेश चतुर्थीसाठी गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्यावतीने 13 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहे. सर्व गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
गणेश मंडळांना ही परवानगी ऑनलाईन पद्धती देण्यात येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ऑनलाईन नोंदणीसाठी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे.
परवान्यासाठी सर्व सभासदांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, दुरध्वनी नंबर, जागा मालकाची संमती, पोलीस स्टेशनचे नाहरकत पत्र, गणेश मंडळ स्थापनेबाबत ठराव, मागीलवर्षी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी घेतली असले तर गेल्या वर्षाचा अधिकृत लेखा परिक्षकामार्फत जमा खर्चाचा हिशोब या कागदपत्रांची आवश्यकता आहे, असेही आवाहन धर्मादाय उपआयुक्त नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.   
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...