Monday, June 10, 2024

वृत्त क्र. 472

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात

शिकाऊ उमेदवारांची नेमणूक 

            नांदेड, दि. 10 :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड मध्ये सन 2024-25 सत्रासाठी व्यवसायनिहाय वाढीव प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार म्हणुन मेकॅनिक मोटार व्हेईकल 50डिझेल मेकॅनिक 28शिट मेटल वर्क्स 10ॲटो इलेक्ट्रीशियन 8मेकॅनिक (रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडीशनर) 4पेन्टर (जनरल) 2वेल्डर (गॅस अॅन्ड इलेक्ट्रीक) 2 अशी एकुण 104 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

(अनुसूचित जातीअनुसूचित जमाती व दिव्यांग करीता शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत.) त्यासाठी आय.टी.आय. उत्तीर्ण किंवा शिकाऊ उमेदवार नेमणुक करण्यात येणाऱ्या विहीत केलेल्या व्यवसायाचे व्होकेशन अभासक्रम पुर्ण केलेल्या व ॲटो इंजीनिअरिंग टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे व नंतर MSRTC DIVISION NANDED या आस्थापनेकरीता ऑनलाईन अप्लाय करुन रा.प. महामंडळाचे विहीत नमुण्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक आहे.

सदर छापील अर्ज दिनांक 11 ते 20 जून 2024 वेळ 15.00 वाजेपर्यंत शनिवाररविवार व सुट्टीचा दिवस वगळुन विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा.प.नांदेड येथे स्विकारले जातील. सदर अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गाकरीता 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. सदर शिकाऊ उमेदवार नेमणुक ही नांदेड जिल्ह्याकरीता असुन फक्त नांदेड जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणुन नेमणुक करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील 3 वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...