Monday, April 26, 2021

हरवलेला मुलगा आढळ्यास मनाठा पोलीस स्टेशनला माहिती कळवावी

 

हरवलेला मुलगा आढळ्यास मनाठा पोलीस स्टेशनला माहिती कळवावी

नांदेड (जिमाका) दि. 26:-  हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील फिर्यादी नामे बबन पि. दत्ता डोके यांनी 10 मार्च 2021 रोजी पालीस स्टेशन मनाठा येथे दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा नामे खंडू पि. बबन डोके वय-17 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. उंचाडा, ता. हदगाव (सध्या वय 21 वर्षे असावे) कोणालाही काही न सांगता निघून गेला आहे.

 

नातेवाईकांकडे व इतरत्र मुलाचा शोध घेतला असता मुलगा मिळून आला नाही. कोणीतरी अज्ञान व्यक्तीने मुलास फुस लावून पळवून नेले असावे या जबाबावरुन पोलीस स्टेशन मनाठा येथे गुन्हा दाखल असून तपासावर आहे. या अपह्त मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. नाव खंडु पि. बबन डोके, पत्ता-मौजे उंचाडा ता. हदगाव जि. नांदेड, वय-17 वर्षे (सध्या-21 वर्षे असावे) रंग-गोरा, बांधा-सडपातळ, उंची-अंदाजे पावणेपाच फुट, अंगावर कपडे-पॅन्ट व शर्ट, पायात-चप्पल, शिक्षण-दहावी, भाषा-मराठी, केस-काळे, चेहरा-गोल वरील वर्णनाच्या अपह्त मुलाची माहिती मिळाल्यास सहकार्य करावे व व्हि.एल.चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. मनाठा- 9767747774 व टी. वाय. चिटेवार, पोलीस उपनिरीक्षक - 9834634149 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक, टि.वाय. चिटटेवार पोलीस स्टेशन मनाठा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...