Wednesday, January 15, 2025

वृत्त क्रमांक 56

रस्त्यावरचे 34 टक्के मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे 

•  रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये हेल्मेट, सीटबेल्ट वापरा मोबाईल पासून सावध रहा 

नांदेड दि. 15 जानेवारी : रस्त्यावर होणाऱ्या अपघातामध्ये 34 टक्के मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यापूर्वीच स्वसुरक्षा म्हणून हेल्मेटचा वापर करावा. सीट बेल्ट वापरावा. वाहन चालवतांना भ्रमणध्वनीचा उपयोग करणे टाळावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

एका वर्षामध्ये फक्त नांदेड सारख्या छोट्या जिल्ह्यात 350 वर नागरिकांचा अपघातात मृत्यू होतो. एखाद्या महामारीप्रमाणे हा आकडा आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारक एकदा वाहन चालवायला लागला की अपघाताच्या धोक्यामध्ये आला हे निश्चित असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामुळे या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये सर्व नागरिकांनी हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट वापरणे, मोबाईल न वापरणे, दारू पिऊन वाहन न चालविणे, ओव्हरस्पिड टाळणे, आपल्या वाहनांना प्रखर प्रकाश असणाऱ्या एलईडी लाईट न वापरणे यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

00000





No comments:

Post a Comment

 उपसंचालक अनिल आलूरकर यांना मातृशोक  नांदेड दि. 15 जानेवारी : नांदेड येथील मूळ निवासी असणारे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अमरावती येथ...