वृत्त क्रमांक 57
सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न
नांदेड, दि. १५ जानेवारी : सहय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयाच्या वितीने दिनांक 25.12.2024 रोजी सकाळी 10.00 वा. मादसवार ईस्टेट क्रिडांगण नांदेड येथे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सदर जिल्हा क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन श्रीमती शिवकांता देशमुख, जिल्हा क्रिडा मार्गदर्शक यांचे हस्ते झाले.
जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवानंद मिनगीरे,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन जी.एच. भायेगांकवर, गृहपाल ,श्रीमती लक्ष्मी गायके, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक .पी.जी. खानसोळे, समाज कल्याण निरिक्षक हे होते.
क्रिकेट स्पर्धेमध्ये सहय्यक आयुक्त समाज कल्याण क्रिकेट संघाचे विजय झाले. तसेच खोखो स्पर्धेमध्ये शासकीय निवासी शाळा संघाचा विजय झाला.व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सहय्यक आयुक्त समाज कल्याण संघाचा विजय झाला. तसेच रस्सीखेचमध्ये सहय्यक आयुक्त समाज कल्याण संघाचा विजय झाला.
वैयक्तीक खेळामध्ये बुध्दीबळ स्पर्धा, 100 मीटर धावणे स्पर्धा ,200 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये महिला व पुरुष अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता. 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये शासकीय अनु.जाती निवासी शाळा हदगांवचे कर्मचारी मारोती चरकेवाड यांचा प्रथम क्रमांक आला व शासकीय अनु.जाती निवासी शाळा माहूरचे कर्मचारी सदशिव सुदेवाड यांचा द्वितीय क्रमांक आला. तसेच 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये सहय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील विजय गायकवाड यांचा प्रथम क्रमांक आला व शिवानंद मिणगीरे,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचा द्वितीय क्रमांक आला. वसतिगृह भागातील उमाकांत जाधव मुलांचे शासकीय वसतिगृह भोकर यांचा 100मीटर धावणे स्पधेत प्रथम क्रमांक आला. तर गंभीर शेंबेटवार शासकीय वसतिगृह नांयगाव यांचा द्वितीय क्रमांक आला. महिला 100 मीटर धावणे स्पर्धामध्ये श्रीमती रोहिणी जोंधळे यांचा प्रथम क्रमांक आला तर श्रीमती लक्ष्मी गायके यांचा द्वितीय क्रमांक आला.
तसेच 200 मीटर धावणे स्पर्धेमध्ये शासकीय अनु.जाती निवासी शाळा हदगांवचे कर्मचारी मारोती चरकेवाड यांचा प्रथम क्रमांक आला तर व शासकीय अनु.जाती निवासी शाळा माहूर चे कर्मचारी सदशिव सुदेवाड यांचा द्वितीय क्रमांक आला.सहय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील शेख मेसीन यांचा प्रथम क्रमांक आला व शेख रहीम यांचा द्वितीय क्रमांक आला. वसतिगृह भागातील श्री राजेश्वर भोसले मुलांचे शासकीय वसतिगृह हदगांव प्रथम क्रमांक आला तर सचिन श्रीमनवार मुलांचे शासकीय वसतिगृह भोकर यांचा द्वितीय क्रमांक आला.बुध्दीबळ स्पर्धेमध्ये विजय पकाने याचा प्रथम क्रमांक आला.
0000
No comments:
Post a Comment