Saturday, November 3, 2018


कौशल्य सेतू अभियानामुळे
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मिळणार रोजगाराची संधी
            नांदेड, दि. 3 :- इयत्ता दहावीमध्ये नापास झाल्यावर बऱ्याचदा घर, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात नाही. मात्र आता इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमामुळे रोजगाराची संधी मिळणार असून कौशल्य सेतू अभियानहा उपक्रम देशभरात उल्लेखनीय ठरला आहे.
            इयत्ता  दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाद्वारे करिअरची संधी उपलब्ध करून देणाऱ्या 'कौशल्यसेतू  अभियाना'चे सर्वत्र कौतुक होत आहे. युवकांना काळानुरुप रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. नापासहा शिक्का पुसून टाकण्यासाठी राज्य शासनाने राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करत या कौशल्य सेतू अभियानाद्वारे विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कौशल्य सेतू अभियानामध्ये इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. संपूर्ण राज्यात अशी 111 प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असून यामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत यशस्वी ॲकेडमी फॉर स्किल्सनॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटीया दोन संस्थांच्या माध्यमातून सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येते.
            बऱ्याचदा इयत्ता दहावीमध्ये नापासाचा शिक्का बसल्याने विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जातात. युवा पिढीचे भवितव्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने कौशल्य सेतू अभियानसुरु केले आहे. या योजनेमुळे इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधण्याची संधी उपलब्ध झाल्याने स्किल इंडिया या महत्वाकांक्षी अभियानाला आणखी बळ मिळणार असून यामुळे देशाची युवा पिढी स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.
            नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटी व यशस्वी स्किल्स या दोन संस्थांच्या माध्यमातून  या विद्यार्थ्यांना सहा महिने कालावधीसाठी मोबाईल रिपेअरिंग, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, ऑटोमोबाईल सर्व्हिस टेक्निशियन (टू  अँड थ्री व्हीलर), मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, डीटीएच सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिस टेक्निशियन अशा विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर भर असलेले हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्याना रोजगारासाठी प्रोत्साहन व अधिक बळ मिळणार आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...