पशुसंवर्धनच्या
नाविन्यपूर्ण योजनेसाठी
ऑनलाईन
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 3 :- पशुसंवर्धन विभागाच्या
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
या प्रवर्गातील 18 वर्षावरील अर्जदारांकडून 15 ते 29 नोव्हेंबर 2018 या कालावधीत
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
दुधाळ संकरित गायी / म्हशीचे गट वाटप करणे, शेळी / मेंढी गट वाटप करणे, मांसल
कुक्कूट पक्षी संगोपण करणे या योजनेची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची
कार्यपद्धतीचा तपशिल https.//ah.mahabms.com या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. इच्छूक
अर्जदारांनी वर नमूद विहित कालावधीत ऑनलाइ्रन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज भरतांना
अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात
येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक
योजनेंतर्गत लाभार्थी निवड अंतिम होईपर्यंत बदलू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment