14 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू
22 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी
नांदेड (जिमाका) दि. 8:- सोमवार 8 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 14 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 10 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 4 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 22 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 176 अहवालापैकी 161 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 673 एवढी झाली असून यातील 21 हजार 634 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 243 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. सोमवार 8 फेब्रुवारीला व्यंकटेशनगर नांदेड येथील 74 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 589 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 9, माहूर तालुक्यांतर्गत 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुगणालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, मुदखेड तालुक्यातर्गंत 1, खाजगी रुग्णालय 3 असे एकूण 22 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, लोहा तालुक्यात 1, कंधार 2 असे एकुण 10 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 2, मुखेड तालुक्यात 1, देगलूर 1 असे एकूण 4 बाधित आढळले.
जिल्ह्यात 243 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 5, मुखेड कोविड रुग्णालय 4, किनवट कोविड रुग्णालय 2, महसूल कोविड केअर सेंटर 4, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 149, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 38, हैद्राबाद येथे संदर्भित 1, नांदेड खाजगी रुग्णालय 10 आहेत.
सोमवार 8 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 163, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 93 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 14
हजार 771
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 87 हजार
728
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 673
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार
634
एकुण मृत्यू संख्या-589
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-243
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-09
00000
No comments:
Post a Comment