Friday, August 2, 2024

 वृत्त क्र 666

लोहा येथे बोगस खते विक्री करणाऱ्या  कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल

 

शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन

 

नांदेडदि. 2 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने खतेबियाणेरासायनिक औषधी व अन्य कृषी सामग्रीची जोरदार तपासणी सुरू केली आहे. लोहा तालुक्यात लोहा येथील बनावट युरिया व खताची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्यात आली आहे. विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

   

लोहा पंचायत समितीमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर शंकर खैरे यांनी लोहा येथील संगम कृषी सेवा केंद्रातून बनावट (बोगस) खताची विक्री होत असल्याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर 24 जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रक निरीक्षक शैलेश हरी वाव्हळे यांनी रामदास गंगाधर बामणे यांच्या मालकीच्या लोहा येथील संगम कृषी सेवा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले कीइफको कंपनीचे बनावट खते आरसीएफ कंपनीचा बनावट युरिया अवैध या संग्रही केलेला आहे .

 

प्राथमिक अंदाजावरून इफको कंपनीच्या तपासणी अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी नमुने तपासले. त्यानंतर सदर नमुने छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोग शाळेमध्ये पाठविण्यात आले. या प्रयोगशाळेने हे सर्व खते बनावट असल्याचे स्पष्ट केल्यामुळे तालुका कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रक निरीक्षक शैलेश वाव्हळे यांनी यासंदर्भात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रासायनिक खते नियंत्रण 1985 , अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाने या संदर्भात रामतीर्थ येथील रहिवासी असणारे रामदास गंगाधर बामणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारीची वाट बघू नका

दरम्यानया घटनाक्रमानंतर कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची खतेरासायनिक औषधीबियाणे याबाबत फसवणूक होणार नाही यासाठी सर्व गुण नियंत्रक निरीक्षकांनी कृषी केंद्रांची तपासणी करावी. या संदर्भातील नियमित अहवाल सादर करावेअसे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी तक्रार करण्याची वाट न बघता या तपासण्या झाल्या पाहिजेत. कोणत्याही अधिकाऱ्याच्या क्षेत्रात असे काही आढळून आल्यास संबंधितांना ही जबाबदार पकडण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही ठिकाणी बनावट विक्री होऊन फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याबाबतही त्यांनी कृषी विभागाला सूचना केल्या आहेत.

00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...