Saturday, May 4, 2024

वृत्त क्र. 407

लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्रक्रियेदरम्‍यान नांदेड जिल्‍ह्यातील 88-लोहा विधानसभा मतदार संघामध्‍ये 7  मे  रोजी ज्‍याठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्‍याठिकाणा पासून  200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

 पक्षकारांना मंडपे उभारण्‍यास, दुकाने चालू ठेवण्‍यास व मोबाईल, कॉडलेसफोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांचा वापर करण्‍यास, संबंधीत पक्षांच्‍या चिन्‍हांचे प्रदर्शन करण्‍यास तसेच सर्व प्रकारचे फेरीवाले, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास याद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध करण्‍यात आले आहे.   

नांदेड जिल्‍ह्यातील 88-लोहा या विधानसभा मतदार संघामध्‍ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया 2024 करीता हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्‍हणुन दिनाक 7  मे  2024 रोजी  मतदान सुरु झाल्‍यापासुन मतदान संपेपर्यंत अंमलात राहील.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...