Thursday, January 16, 2025

 वृत्त क्र. 61 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे

माहूर येथील शिबीर 21 जानेवारीला

 

नांदेड दि. 16 जानेवारी :- शुक्रवार 17 जानेवारी रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह कंधार ऊर्स निमित्त नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दैनंदिन सर्व कामकाज बंद राहणार असल्याने माहूर येथे आयोजित शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीचे मासिक शिबिर मंगळवार 21 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.

 

शुक्रवार 17 जानेवारी रोजी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरीता अपॉईमेंट घेतलेल्या अर्जदारांनी 21 जानेवारी रोजी माहूर येथील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित रहावेअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...