Thursday, January 16, 2025

 वृत्त क्र. 60 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24

नांदेड जिल्ह्यातून अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि 16 जानेवारी :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्अ क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी व संघटकांनी अर्ज करण्याच्या जिल्हा क्रीडा विभागाने केले आहे.

 

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कारक्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

 

शासन निर्णय दि.29 डिसेंबर,2023 अन्वये व शासननिर्णय दि.25 जानेवारी,2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,2023 विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शकखेळाडूदिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/ व्यक्ती यांच्याद्वारा दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी,2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

अर्ज सादर करणा-या इच्छूक क्रीडा मार्गदर्शकखेळाडूसाहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (SCROLLING Link) मध्ये उपलबध करुन दिलेलया लिंकवर दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी,2025 या कालावधीत व दि.26 जानेवारी,2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावे असे संचालनालय व या कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment

 बेसबॉल छायाचित्र