Friday, April 19, 2024

वृत्‍त क्र. 364

 

कृपया सुधारित बातमी घ्यावी

 

निवडणूक कर्मचा-यांसाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था

 

नांदेड दि. 19 :  नांदेड व हिंगोली लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचा-यांना नऊ विधानसभा मतदार संघात 24 एप्रिल 2024 रोजी नेऊन सोडणे व 26 एप्रिल 2024 रोजी निवडणूक मतदान प्रक्रीया पार पाडल्‍यानंतर परत त्‍यांना त्‍यांच्‍या विधानसभा मतदार संघात घेवून येण्‍यासाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी त्‍या-त्‍या मतदार संघातील नेमून दिलेल्‍या केंद्रावर 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी ७ वाजता उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.


निवडणुकीच्‍या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्‍या वाहतुकीसाठी  44  सिटर बसेस आहेत. दि. 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी ७ वाजता संबंधित विधानसभा मतदारसंघात बस उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. 83 किनवट विधानसभा मतदार संघासाठी 14, 84-हदगाव मतदार संघासाठी 11 , 85-भोकर मतदार संघासाठी 12, 86- नांदेड उत्‍तर व 87- नांदेड दक्षिण मतदार संघासाठी 19,  88-लोहा मतदारसंघासाठी 14, 89-नायगाव मतदार संघासाठी  12,  90 देगलूर मतदार संघासाठी 13 बसेस तर 91- मुखेड मतदार संघासाठी 13 अशा एकूण 108 बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याबाबत जिल्‍हा प्रशासनाने परिवहन विभागाशी करार केला आहे.24 एप्रिल रोजी खालील दिलेल्या ठिकाणी तिसरे प्रशिक्षण होणार आहे. व 25 एप्रिल रोजी मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना होणार आहेत 24 एप्रिल रोजी तिसऱ्या प्रशिक्षणाला मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना त्यांना नेमून दिलेल्या मतदार संघात घेऊन जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे.


मतदान अधिकारी कर्मचा-यांना जाण्‍या - येण्‍यासाठी पुढीलप्रमाणे ठिकाणे नेमून दिलेली आहेत. निवडणूक साहित्‍य घेवून या कर्मचा-यांना ए‍क दिवस आधीच मतदान केंद्रावर पोहोचणे सोपे व्‍हावे यासाठी ही व्‍यवस्‍था आहे. निवडणूक चमुना पुढील केंद्रावरुन बसेसची व्‍यवस्‍था त्‍या-त्‍या ठिकाणी करण्‍यात आली आहे. 83- किनवट मतदार संघासाठी साठी शासकीय आयटीआय गोंकुदाकिनवट येथे तर 84- हदगाव साठी समाज कल्‍याण विभागाचे मागासवर्गीय शासकीय मुलीचे वसतिगृहबुध्‍दभुमी  वसाहततामसा रोडहदगाव 85- भोकर मतदार संघासाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भोकर, 86-नांदेड उत्‍तर व 87-नांदेड दक्षिण साठी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड, 88-लोहा मतदार संघासाठी पंचायत समितीतहसिल कार्यालय परिसर लोहा 89-नायगाव  मतदार संघासाठी शासकीय आयटीआय  नायगाव, 90- देगलूर मतदार संघासाठी तहसिल कार्यालय देगलूर, 91-मुखेड मतदार संघासाठी मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालयमुखेड येथे राहणार आहे. यामुळे निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी याची नोंद घ्‍यावीअसे निवडणूक विभागाने कळविले आहे.

००००



 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...