Friday, April 19, 2024

 वृत्‍त क्र. 362

निवडणूक साहित्याची मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयातून उचल

साहित्य वितरण कक्षाची अविरत सेवा

नांदेड दि. १९ : मुंबई, पुणे, संभाजीनगर आदी ठिकाणावरून शासकीय मुद्रणालयातून येणारे विविध प्रकारचे साहित्य वितरणाचे महत्त्वपूर्ण काम साहित्य वितरण कक्षातून सुरू आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास हे वितरण पूर्ण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये आवश्यक साहित्य वितरण वेळेत व्हावे, याला अधिक महत्त्व दिले जाते. यासाठी आचारसंहिता लागल्यापासून साहित्य वितरण कक्ष स्थापन केला जातो. नांदेड साठी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रूपाली चौगुले यांच्या मार्गदर्शनात नियोजन भावनांमध्ये या साहित्य कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.

निवडणुकांमध्ये अधिक सुबक, प्रगत असे साहित्य सध्या वापरण्यात येत आहे. ईव्हीएमचे बॅलेट युनिट कव्हर करणारे कंपार्टमेंट, पोस्टर, सूचना पत्र,ओळखपत्रे,लेखन सामग्री, स्टेशनरी, विविध नमुने, लिफाफे, कागदी सील, वोटर स्लिप, बॅलेट पेपर आदी साहित्य या कक्षामार्फत दिले जाते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह त्यांची मोठी टीम या कार्यामध्ये सहभागी झाली आहे.
00000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...