Tuesday, November 24, 2020

 

वृत्त क्र.  870                       

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी

महाडीबीटी पोर्टलवर अचूक माहिती भरावी

 

नांदेड (जिमाका) 24 :- सन 2018-19 2019-20 मधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, फ्रिशीप रक्कम अद्याप त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क करुन त्वरीत त्रुटीची पुर्तता करावी. त्यानंतर महाडीबीटी पोर्टल प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या आधार संलग्निकृत बँक खात्यावर रक्कम जमा होईल. संबंधित विद्यार्थी व महाविद्यालये संयुक्तपणे ही कार्यवाही पूर्ण करावी. अन्यथा महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना अनुज्ञेय शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार नाही असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त  तेजस माळवदकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

सन 2018-19 2019-20 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती/फ्रिशिप योजनेच्या अदायगीची रक्कम विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांच्या बँक खात्यावर जमा करतांना येणाऱ्या अडचणी, त्रुटींची पुर्तता संबंधित विद्यार्थ्यांकडून करुन घेण्यात यावी . सन 2018- 19 या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांकडून राबविल्या जाणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या विविध योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना अदा करावयाची शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर जमा करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणालीमार्फत www.mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ शासनांकडून कार्यान्वित करण्यात आले आहे. सदर संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन अर्जाची प्रींट व आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयांकडे सादर केल्यानंतर संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टल प्रणालीद्वारे या कार्यालयाच्या लॉगीन वर फॉरवर्ड केली जातात. या कार्यालयाच्या लॉगिन वर प्राप्त झालेल्या अर्जांपैकी छाननीप्रक्रियेअंती पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाना महाडीबीटी पोर्टल प्रणालीमध्ये मंजुरी देण्यात येते. तद्नंतर , या कार्यालयाच्या लॉगिन मधून समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचे स्तरावरुन मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जावर पुढील कार्यवाही होऊन वर नमुद योजनाअंतर्गत निर्धारित केलेली लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर नियमाप्रमाणे जमा करण्यात येते.

सन 2018-19 2019-20 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जाती प्रवर्गातील कांही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यासंबंधी त्रुटी वा अडचणी जसे विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्निकृत नसणे, बँक खाते बंद असणे, ऑनलाईन अर्ज भरताना आधार क्रमांक नोंदविलेला नसणे. फॉर्म भरतांना चुकीचे आधार क्रमांक नोंदविणे इ.कारणांमुळे आयुक्तालय पुणे यांचे स्तरावरुन विद्यार्थ्यांच्या,महाविद्यालयांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करतांना महाडीबीटी पोर्टल प्रणालीद्वारे अडचणी येत असल्याचे कळवून ज्या विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रात चुका आहेत. त्या लगेच दुरुस्त करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सदरील डेटा या कार्यालयांकडून संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आला असून महाविद्यालयांनी डेटामधील विद्यार्थ्यांच्या नावासमोर नमुद केलेली अडचण व त्रुटीबाबत संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करुन घेण्यासाठी पाठपुरावा करावा असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...