वृत्त क्र. 872
आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी केंद्राला मंजुरी
नांदेड (जिमाका) 24 :- धान खरीप पणन हंगाम 2020-21 साठी किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ या खरेदी केंद्राला धान खरीप पणन हंगाम 1 ऑक्टोंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत खरेदी करण्यासाठी अटी व शर्तीनुसार मंजुरी देण्यात आली आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये भरडधान्य खरेदी करण्याकरीता नेमणूक केलेल्या अभिकर्ता संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक -2 प्रादेशिक व्यवस्थापक यवतमाळ यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे किनवट तालुक्यातील हे केंद्र अटी व शर्तीनुसार मंजूर करण्यात आले आहे. यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचा दृष्टीने खरेदीच्या वेळी सर्व खरेदी केंद्रावर सुरक्षितरित्या खरेदी होण्यासाठी सामाजिक अंतर सोशल डिस्टस्न्सिग निर्जतुकीकरण इत्यादी बाबीचे पालन होणे आवश्यक आहे. याकरीता अभिकर्ता संस्थानी 4 मे 2020 अन्वये दिलेल्या सूचनाचे पालन करुन सर्व खरेदी करण्याची दक्षता घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्ष खरेदी प्रक्रीया आदिवासी क्षेत्रासाठी महामंडळ नाशिक या अभिकर्ता संचामार्फत करण्यात यावी असेही निर्देशित आहे.
धानाची खरेदी करताना संबंधित तालुक्यातील
तहसिलदारांनी खरेदीच्या कालावधीत दर्जा नियंत्रण व दक्षता पथकांची स्थापना करावी
असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.
000000
No comments:
Post a Comment