वृत्त क्र. 871
उर्ध्व पेनगंगा सिंचनासाठी रब्बी हंगाम
प्रथम पाणीपाळी 27 नोव्हेंबरला
नांदेड (जिमाका) 24 :- उर्ध्व
पेनगंगा प्रकल्प रब्बी व उन्हाळी हंगाम सन 2020-21 मधील उपलब्ध साठ्यानुसार
पाणीपाळ्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांचे अध्यक्षतेखाली 19 नोव्हेंबर
2020 रोजी कालवा सल्लागार समितीच्या सर्व शासकीय सदस्यांची बैठक झाल्याचे नमूद
करण्यात आले होते. त्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सर्व शासकीय
सदस्यांची बैठक दृकश्राव्य माध्यमाद्वारे (VC) संपन्न झाली असे वाचावे. या बैठकीमध्ये
सिंचनासाठी रब्बी हंगाम सन 2020-21 मधील प्रथम पाणीपाळी 27 नोव्हेंबर 2020 रोजी
सोडण्याचे नियोजन करण्यात आले. रब्बी हंगामातील उर्वरीत 2 पाणीपाळ्या व उन्हाळी
हंगामातील 4 पाणीपाळ्या सोडणेबाबतचा अंतीम निर्णय
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल असे उर्ध्व पेनगंगा
प्रकल्प विभाग क्र.1 चे उप कार्यकारी अभियंता, ए.एच.गोकुळे
यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment