Tuesday, November 24, 2020

 

पदवीधर निवडणूकीच्या प्रक्रीयेत

मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी

-डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) 24 :- निवडणूकाबाबतचे प्रशिक्षण हे आपली जबाबदारी व कर्तव्य अचूक पार पाडता यावीत यासाठी असतात. नेहमीच्या निवडणूकापेक्षा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी असलेली निवडणूक ही  बॅलेट बॉक्‍सचा वापर करुन होत असून मतदान केंद्रावर गोंधळ गडबड होणार नाही याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले. शंकरराव चव्‍हाण सभागृह येथे नुकतेच पदवीधर मतदान प्रक्रीयाबाबतचे दुसरे प्रशिक्षण संपन्‍न झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पदवीधर मतदारसंघ निवडणुकचे पालक तथा समन्‍वयक आर. एस. अहीरे, अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक जिल्‍हाधिकारी किर्तीकुमार पुजारा, निवडणूक उपजिल्‍हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार सारंग चव्‍हाण, उर्मीला कुलकर्णी उपस्थित होते.

दुसऱ्या प्रशिक्षणाचे वैशिष्‍टये म्‍हणजे निवडणुक प्रशिक्षणासाठी प्रत्‍यक्ष व्‍यासपिठावर मतदान कक्ष तयार करुन तहसिलदार किरण अंबेकर यांनी अत्‍यंत अभ्‍यासपुर्ण पध्‍दतीने प्रशिक्षण दिले. यामध्‍ये मतदान केंद्रात मतदार आल्‍यापासुन मतदान करुन जाईपर्यंत कोणकोणत्‍या बाबी करणे आवश्‍यक आहे. याची बारकाईने माहिती देण्‍यात आली. या प्रसंगी प्रशिक्षण घेणाऱ्यांनी विविध प्रश्‍न विचारले याचे समर्पक व योग्‍य उत्‍तरे किरण अंबेकर यांनी देऊन शंकेचे पुर्ण निरसन केले .

प्रथमच अशा नाविन्‍यपुर्ण पध्‍दतीचा वापर केल्‍यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्यांनी समाधान व्‍यक्त केले व जिल्‍हाप्रशासनाचे कौतुक केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब त‍हसिलदार मुगाजी काकडे यांनी केले तर आभार सारंग चव्‍हाण यांनी व्‍यक्त केले. हे प्रशिक्षण यशस्‍वी करण्‍यासाठी कुणाल जगताप, शोभा माळवतकर , कविता जोशी, दशरथ आडेराघु, जि.आर. शिवरात्री, राजेश कुलकर्णी, हणमंत जाधव व स‍य्यद युसुफ यांनी सहकार्य केले .

00000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...