Tuesday, November 24, 2020

 

वृत्त क्र.  869                                  रास्तभाव धान्य दुकानात

नोव्हेंबर महिन्याची साखर उपलब्ध

 

नांदेड (जिमाका) 24 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी व एपीएल (केशरी) शेतकरी कुटूंब लाभार्थीसाठी दिवाळी निमित्त शासनाने नोव्हेंबर 2020 साठी नियमित नियतन साखर प्राधान्य कुटुंब योजनेसाठी प्रति शिधापत्रिका (प्रति कुटूंब) एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍हयासाठी  5 हजार 172 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.

तालुका निहाय नियतन क्विंटलमध्ये पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड - 758,अर्धापूर- 163, मुदखेड-202  कंधार-408, लोहा-454, भोकर-245, उमरी-194, देगलूर-292, बिलोली-282.5, नायगाव-346, धर्माबाद-151, मुखेड-461, किनवट- 344.5, माहूर-178, हदगाव-475.5, हिमायतनगर-217.5, असे एकूण 5 हजार 172 क्विंटलचे साखरेचे नियतन जिल्ह्यासाठी करण्यात आले आहे. याची सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गंत  प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व एपीएल (केशरी ) शेतकरी  कुटूंब शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून या परिमानानुसार मंजुर साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...