Tuesday, March 9, 2021

 राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यासाठी 1408 कोटींच्या निधीची तरतूद

- पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण

मुंबई, दि. 9 : राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या सन 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील 206 कामांसाटी सुमारे 1408 कोटी 93 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील विविध कामांना भरीव निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. पालकमंत्री म्हणून केलेल्या मागण्यांना अर्थमंत्री श्री. पवार यांनी भरीव तरतूद केल्याचे अर्थसंकल्पात दिसून आले आहे. 

यानुसार, नांदेड जिल्ह्यात नाबार्ड अंतर्गत 46 कांमासाठी 134 कोटी 55 लाख, राज्यमार्गाच्या 32 कामांसाठी 356 कोटी 25 लाख, प्रमुख जिल्हा मार्गाच्या 86 कामांना 488 कोटी 63 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयीन  इमारतींच्या 9 कामांसाठी 216 कोटी 38 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी निवासस्थानांच्या 14 कामांसाठी 41 कोटी 64 लाख, विश्रामगृहांच्या 11 कामांसाठी 47 कोटी 92 लाख, महसूल विभाग इमारती/निवासस्थानाच्या 2 कामांसाठी 11 कोटी 84 लाख, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इमारतीच्या 2 कामांसाठी 35 कोटी 86 लाख आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या इमारतीच्या 4 कामांसाठी 75 कोटी 86 लाख निधी अर्थसंकल्पित झाला आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील या विविध कामांना निधीची तरतूद केल्यामुळे पुढील वर्षभरात या कामांना वेग येईल व ती लवकर पूर्ण करण्यात येतील, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. 
--

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...