Friday, August 16, 2024

वृत्त क्र. 726

सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड, दि. 16 ऑगस्ट :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024  रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाच्या दिवशी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 19 ऑगस्ट 2024  रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधिनी (प्रशिक्षण केंद्र), एसबीआय एटीएमच्या मागे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 1060 राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्हयाच्या दलाकडून 7 ते 9 नोव्हेंबर ...