Friday, August 16, 2024

वृत्त क्र. 728

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन

नांदेड, दि. 16 ऑगस्ट :-  इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इमाव, विजाभज व विमाप्र या समाजासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागामार्फत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळ ही महामंडळे कार्यरत आहेत. या मंडळातर्गत उपकंपन्या तसेच महाज्योती, अमृत यासारख्या संस्थामार्फत देखील अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनाची माहिती लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी 15 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्ह्यात तालुकास्तरावर मेळावे आयोजित केले आहेत.

दिनांक 17 ऑगस्ट रोजी भोकर आश्रमशाळेत, 18 ऑगस्ट आश्रमशाळा पळसा, हदगाव , 19 ऑगस्ट आश्रमशाळा हिमायतनगर, 20 ऑगस्टला आश्रम शाळा दहेली तांडा, किनवट,  21 ऑगस्ट आश्रमशाळा कुटूंरतांडा नायगाव, 22 ऑगस्ट आश्रमशाळा दगडापूर बिलोली, 23 ऑगस्ट आश्रम शाळा भुतन हिप्परगा देगलूर, 24 ऑगस्टला आश्रम शाळा कुंडलवाडी तालुका बिलोली, 26 ऑगस्ट आश्रमशाळा कमळेवाडी ता. मुखेड, 27 ऑगस्ट आश्रम शाळा नेहरुनगर नागलगाव तांडा, कंधार, 27 ऑगस्ट आश्रम शाळा विठ्ठलनगर लोहा, 28 ऑगस्टला आश्रमशाळा, मुदखेड, 29 ऑगस्टला आश्रम शाळा उमरी, 30 ऑगस्टला आश्रमशाळा पळशी तांडा किनवट येथे मेळावे आयोजित केले आहेत.

या मेळाव्यासाठी नोडल अधिकारी म्हणून समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी यांची नियुक्ती केली आहे. हे मेळावे त्या- त्या तालुक्याच्या आश्रमशाळेत आयोजित केले आहेत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी व या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक बी.एस. दासरी यांनी केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...