Friday, August 16, 2024

 वृत्त क्र. 729

बनावट विदेशी मद्यावर मुखेड तालुक्यातील

हिब्बट शिवार येथे धडक कारवाई

नांदेड दि. 16 ऑगस्ट :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या मार्गदशनाखाली दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांची बनावट विदेशी मद्यावर मुखेड तालुक्यातील हिब्बट शिवार येथे धडक कारवाई करण्यात आली. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या टोल क्र. १८००२३३९९९९ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्र. ०२४६२- २८७६१६ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक (अं व द) सुनिल चव्हाण, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपआयुक्त व्ही. एच.तडवी, अधीक्षक गणेश  पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नांदेड यांच्या पथकाने मुखेड तालुक्यातील बोरगाव फाटा ते एकलारा रोड, हिब्बट शिवार येथे अवैधपणे बनावट मद्याची चोरटी वाहतुक, विक्री केली जात असल्याची नुकतीच माहिती मिळाली होती.

 राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक नांदेड जिल्हा व त्यांच्या पथकाने बोरगाव फाटा ते एकलारा रोड, मौ. हिब्बट शिवार ता. मुखेड येथे सापळा रचून आरोपी प्रशांत लक्ष्मण श्रीरामे व गंगाधर भोसले (फरार) यांना बनावट विदेशी मद्याची वाहतुक करतांना तपासणी केली. यावेळी यांचे ताब्यातील एक दुचाकी व एक चार वाहनात 180 मि.ली. क्षमतेचे मॅकडॉल नं.-1 व्हिस्कीच्या या विदेशी दारुचे 6 सिलबंद बाटल्या, 180 मि.ली. क्षमतेचे रॉयल स्टॅग व्हिस्की बनावट विदेशी दारुचे 414 सिलबंद बाटल्या, बनावट हॅपेरियर ब्ल्यु व्हिस्की नावाचे विदेशी मद्याच्या 156 सिलबंद बाटल्या असा मुद्देमाल जप्त करून आरोपी प्रशांत लक्ष्मण श्रीरामे याला अटक केली. परंतू मुळ सुत्रधार गंगाधर भोसले हा घटनास्थळावरून फरार झाला.

या गुन्ह्यातील ठिकाणाहून एक ह्युंदाई कंपनी निर्मित पांढऱ्या Verna चार चाकी वाहन, एक होंडा कंपनी निर्मित दुचाकी वाहन, बनावट विदेशी दारुच्या 576 सीलबंद बॉटल्या असा एकुण रूपये ५,००,३८० इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जवान गिरीधर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  दुय्यम निरीक्षक एस.टी. कुबडे यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(A),(B),(D),(E) ८०,८१,८३,९०,१०३ भारतीय न्याय संहिता चे कलम 123 अन्वये गुन्हा नोंद केला असून ज्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रा एस. टी. कुबडे हे करीत आहेत. या ठिकाणाहून 1 आरोपींना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने गुन्ह्यांतील अटक आरोपींस 16 ऑगस्ट पर्यंतची एक्साईज कोठडी सुनावली आहे.

 या कारवाईत अधीक्षक गणेश पाटील यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत उपअधीक्षक मुपडे, देगलुर विभाग निरीक्षक ए. महिंद्रकर, एस. बोरुडे, सचिन शेटे, अमित वालेकर,एस. टी कुबडे, बी. बी. ईथ्थर सर्व दुय्यम निरीक्षक तसेच बालाजी पवार, मो. रफिक, शिवाजी कोरनुळे, सर्व स.दू. नि व जवान सर्वश्री विकास नागमवाड, गणेश रेनके, मुरलीधर आनकाडे, गिरीधर भालेराव, आर बी. फाळके, श्रीनिवास वजिराबादे, मारोती सुरनर, प्रवीण इंगोले, शिदास नंदगावे व जवान निवा. चा. रावसाहेब बोदमवाड एफ. के. खतीब, एस. जी. संगेवार तसेच महिला जवान श्रीमती ए. जी. घुगे यांचा सहभाग होता.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...