Friday, May 7, 2021

 

जिल्हा रूग्णालयात सिंगापूरचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर

तातडीने रूग्णसेवेत वापरण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- राज्य शासनाने येथील जिल्हा रूग्णालयाला सिंगापूरचे 10 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत. हे कॉन्स्ट्रेंटर तातडीने रूग्णसेवेसाठी वापरण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सिजनचे उत्पादन आणि साठवणुकीची क्षमता वाढवली जाते आहे. दरम्यान, या आणिबाणीच्या परिस्थितीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असून, सिंगापूरच्या टेमासेक फाऊंडेशन या संस्थेने राज्य शासनाला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी 10 कॉन्स्ट्रेंटर नांदेडच्या जिल्हा रूग्णालयाला सुपूर्द करण्यात आले आहेत. या सहकार्यासाठी पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी सार्वजनिक  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत. 

नांदेड जिल्हयातील कोरोनाबाधितांवर तातडीने योग्य उपचार सुरु व्हावेत, त्यांची बेड, ऑक्सिजनसाठी धावपळ होऊ नये, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन नांदेड येथे तत्परतेने जंबो कोविड केअर सेंटर उभारले. त्याशिवाय एसडीआरएफमधून जिल्ह्याला 52 नव्या रुग्णवाहिका मिळवून दिल्या. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्याला नवे दहा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध झाल्याने रूग्णांसाठीच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...