Wednesday, June 21, 2017

निरोगी जीवनासाठी योग उपयोगी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
            नांदेड दि. 21  :- निरोगी जीवनासाठी योग उपयोगी असून योग दिनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबद्दलची जागरुकता वाढली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नांदेड शहरातील मध्यवर्ती योग शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन यात्री निवास नांदेड येथे करण्यात आले होते.
            यावेळी अपर जिल्हधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक डी. पी. सिंग, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एच. श्यामकुवर, योग समन्वय समितीचे समन्वयक डॉ. वाय. आर. पाटील, गुरुद्वारा लंगर साहिबचे बाबा अमरजित सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले की , आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम करणाऱ्या नागरीकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिर्घ आरोग्याच्यादृष्टिने योग करणे आवश्यक आहे, असे सांगुन त्यांनी योगाचे महत्व विशद केले.  
            या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त योग शिक्षक अनिल अमृतवार यांनी विविध प्रकारच्या योग साधनासह प्राणायमही करुन घेतला. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमियोपॅथिक महाविद्यालये, आरोग्य विज्ञान संस्था, योग व सामाजिक संस्था यांचे संयुक्तरित्या योग प्रात्यक्षिक वर्ग घेवून हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या शिबिरात जिल्ह्यातील योगसाधक, महिला, वैद्यकीय, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, महाविद्यालयीन युवक, नागरिक आदींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...