Wednesday, June 21, 2017

जप्त रेतीसाठ्याचा नांदेड तहसिल
कार्यालयात आज लिलाव
 नांदेड दि. 21नांदेड तालुक्यातीविनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून रहाटी, सोमेश्वर, नाळेश्वर, वाघी येथील अंदाजे 11 हजार 680 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याचा जाहीर लिलावाची दुसरी फेरी व गंगाबेट, वाहेगाव, म्हाळजा, वांगी, नागापूर येथील 3 हजार 115 ब्रास रेतीसाठ्याचा जाहीर लिलावाची तीसरी फेरी गुरुवार 22 जुन 2017 रोजी दुपारी 12 वा. उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
जनतेनी या रेती साठ्याचे ठिकाणी रेती (वाळू) साठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...