Thursday, May 25, 2023
शेतकऱ्यांनी उपकर योजनेतंर्गत अनुदानावर कृषि साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी उपकर योजनेतंर्गत अनुदानावर
कृषि साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 25 :- सन 2023-24 मध्ये जिल्हा परिषद उपकर योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर डी.बी.टी. व कॅशलेस पध्दतीचा अवलंब करुन ताडपत्री, 3 एचपी / 5 एचपी ओपन वेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर), ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर, सोयाबीन प्लॅन्टर सोलार फेन्सीग एनरगायझर, बिजप्रकियेसाठी अनुदान, सेंद्रीय खत निर्मितीसाठी लागणारे बेड इ. कृषि साहित्याचा लाभ देण्यासाठी कृषी साहित्यांचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तरी गरजू शेतकऱ्यांनी अनुदानावर औजारे / कृषि साहित्य मिळणेसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह प्रस्ताव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हा परिषद कृषि विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
या योजने अंतर्गत औजाराचा, कृषि साहित्याचा लाभ देण्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांचा अर्ज, स्वत:चे नावे जमीन असल्याबाबत चालू आर्थिक वर्षाचा सात/बारा व 8- अ (होल्डींग) चा उतारा, आधार सलग्न बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत, आधार कार्डची छायांकीत प्रत, शेतकऱ्याकडे जनावरे असल्याबाबत पशुसंवर्धन विभागाचे प्रमाणपत्र. (कडबा कटरचा लाभ घेणेसाठी), ओलीताची सोय (विहीर/शेततळे/नाला) असल्याबाबत तलाठी यांचे प्रमाणपत्र. (विद्युत पंप संचचा लाभ घेणेसाठी), अधिकृत विद्युत कनेक्शन असल्याबाबत लाईट बिलाची छायांकित प्रत अथवा कोटेशन भरलेल्या पावतीची छायांकित प्रत. (विद्युत पंप संचचा लाभ घेणेसाठी) , जातीच्या प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत. (लाभार्थी शेतकरी मागास वर्गीय असल्यास), अपंग असल्यास प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अपंग प्रमाणपत्र, अर्जदार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असल्यास तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, घरघुती बियाणे उपलब्ध असलेले/स्वयंघोषणापत्र व उन्हाळी बियाणे उत्पादित केले स्वयंघोषणापत्र (सोयाबिन प्लॅन्टर घेणेसाठी), कुटुंबाचे रेशन कार्ड इ.कागदपत्राची आवश्यकता आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...
No comments:
Post a Comment