Wednesday, May 24, 2023

 हदगाव येथे शुक्रवारी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती

करिअर समुपदेशन मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत हदगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे शुक्रवार 26 मे 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा तामसा रोड हदगाव येथील सुमन गार्डन ॲन्ड लॉन्स येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या कालावधीत होईल. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होईल. हदगाव तालुक्यातील विद्यार्थी, पालकवर्ग व शिक्षकांनी https://mahacareer.globalsapio.com या लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.   

 

या मेळाव्यात प्रामुख्याने दहावी, बारावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण व इतर अभ्यासक्रम, अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, कर्ज योजना या विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. या मेळाव्यास हदगावचे उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल वहिद, तहसीलदार जीवराज डापकर, प्रभारी पोलीस निरीक्षक जगन पवार, नगरपरिषदेचे मुख्यधिकारी दामोधर जाधव, उपकोषागार अधिकारी सचिन कद्रे, एसबीआय बँकेचे शाखा अधिकारी अभिषेक रोहतगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देवराव भिसे, गटविकास अधिकारी दशरथ आडेराघो, गटशिक्षणाधिकारी किसनराव फोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

या मेळाव्याच्या संयोजक समितीमध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर, कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, हदगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य फारूकी वासे यांचा समावेश आहे.  

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...