मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यात बेरोजगार उत्पादन उद्योग व सेवा उद्योगांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत सेवा उद्योगासाठी 20 लक्ष रुपये मर्यादेपर्यंत व उत्पादन उद्योगासाठी 50 लक्ष रुपयांपर्यत बँकेमार्फत अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेत इच्छुक अर्जदारांनी https/maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
या योजने अंतर्गत उद्योग विभागामार्फत बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर जास्तीत जास्त 35 टक्के पर्यत (जात प्रवर्ग/उद्योग कार्यक्षेत्रानुसार) अनुदान देय आहे. ऑनलाईन केलेल्या कर्ज प्रकरणांची दरमहा छानणी नंतर ऑनलाईन कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी शिफारस करण्यात येतात व कर्ज मंजुरी /वाटपानंतर अनुदान ऑनलाईन बँकेत जमा करण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे कागदपत्राची यादी पुढीलप्रमाणे आहे. पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा दाखला (टीसी), डोमिसाईल /रहिवासी प्रमाणपत्र, अनुसूचित जाती-जमातीसाठी जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागासाठी गावाचा लोकसंख्येचा दाखला/प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांचे), हमीपत्र (अंडरटेकींग फॉर्म) वेबसाइटवरील मेन्युबारमध्ये उपलब्ध, प्रकल्प अहवाल इ. कागदपत्रे 300 केबी (KB) पर्यत असावे. तसेच हमीपत्र व प्रकल्प अहवाल 1 (Mb) एमबी पर्यत असावे असे जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment