वृत्त क्र. 1114
कर्णबधिर / मुकबधिर मतदारांसाठी साईन लँगवेजच्या माध्यमातून मतदार जनजागृती
नांदेड, दिनांक १८ नोव्हेंबर :- नांदेड 16 लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत लोकशाही बळकटीकरणासाठी व मतदानाचा टक्का वाढाविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या स्पीप टिमच्या माध्यमातून कर्णबधिर मतदारांसाठी साईन लँगवेज च्या माध्यमाने मतदान जनजागृती करण्यात येत आहे. सुरेश गुंडे या मुकबधिर कर्मचाऱ्यांच्या साईन लॅगवेजच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. मी मतदान करणार आहे आपणही मतदान करुन राष्ट्रीय उत्सवात तथा राष्ट्रीय कार्यास योगदान दया असा संदेश देण्यात आला. सदर माहिती साईन लँगवेजमध्ये दिल्यामुळे कर्णबधिर/ मुकबधिरांमध्ये मतदान जनजागृतीचा संदेश पोहचविणे सोपे झाले आहे. यावेळी वामने एच पी, ढवळे एस के,देवकर,रनविरकर, लबडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment