वृत्त क्र. 1113
87-नांदेड दक्षिणची निवडणूक तयारी पूर्ण
नांदेड, दि. १८ नोव्हेंबर:- 16 नांदेड लोकसभा पोट निवडणूक व 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आदेश,साहित्य व इतर सर्व बाबींसाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या भव्य प्रांगणात तयारी पूर्ण झाली असून निवडणूक प्रक्रियेतील कार्यासाठी सुसज्ज झाले आहे.
नांदेड दक्षिण मतदारसंघात एकूण मतदार 316821 असून मतदान केंद्रांची संख्या 312 एवढी आहे. एकूण नियुक्त केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी 1560 चे आदेश तयार करण्यात आले आहेत. केंद्रांना 34 झोनमध्ये वितरित करण्यात आले आहेत. या झोनचे एकूण 103 रुट निर्माण करुन तेवढ्याच रुट गाईडची नेमणूक करण्यात आली आहे. आदेश वाटपासाठी 10 टेबल तर मतदान यंत्र, व्हिव्हिपँटसह इतर साहित्य वाटपाचे 31 टेबल करण्यात आले आहेत. या मतदान क्षेत्रात 20 मतदान केंद्रे हे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. ज्यामध्ये केंद्र क्रमांक 19,84,88,90,94,98,102,55,124,129,204,223,255,289,49,147,186,233,114,210 यांचा समावेश आहे.
या प्रत्येक केंद्रासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे विशाल व भव्य मंडप उभारुन नियंत्रण करण्यात येत आहे. याशिवाय सर्व मतदान केंद्रावर वीज,पिण्याचे पाणी,यथायोग्य फर्निचर, दिव्यांगासाठी रँम्पसह आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना नाष्टा, जेवण व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ०८७ नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ, तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलु, संजय नागमवाड यांनी दिली आहे.
या व्यवस्थापनासाठी पेशकार राजकुमार कोटुरवार, प्रशिक्षण कक्षाचे सदस्य संजय भालके, राजेश कुलकर्णी व विजयकुमार चोथवे , बी.एस.पांडे,मकरंद भालेरावसह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
००००००
No comments:
Post a Comment