Tuesday, April 11, 2023

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी

अर्ज करण्यास 3 मे पर्यत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राष्ट्र उभारणीच्या कार्यात युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करणेस्वच्छता अभियानआरोग्य जागृतीसाक्षरतालिंग, भेदसामाजिक समस्याचे निराकरण करण्यासाठी नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने राष्ट्रीय युवा कोर राष्ट्रीय स्वयंसेवक पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आता 3 मेपर्यत मुदतवाढ दिली असून उमेदवारांनी या https://nyks.nic.in/nycapp/main.asp  संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी चंद्रकला रावळकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय युवा कोर राष्ट्रीय स्वयंसेवक पदासाठी उमेदवाराचे वय एप्रिल 2023 रोजी 18 वर्षापेक्षा जास्त व 29 वर्षाच्या आत असावे. उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी पास असावे. पदवीधर व समाजकार्य पदवीधरांस प्राधान्य दिले जाईल. स्वयंसेवकासाठी नियमित शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र राहणार नाहीत. मासिक एकत्रित मानधन रुपये 5 हजार रुपये असून यामध्ये प्रवास भत्ता समाविष्ट आहे. ही नोकरी नसल्यामुळे स्वयंसेवकास कोणताही क्लेम मिळणार नाही. कोणत्याही प्रकारचा रोजगारांसाठी अधिकार राहणार नाही. प्रत्येक तालुक्यासाठी स्वयंसेवक असतील. कालावधी एक वर्षाकरीता असून कामाचे स्वरूप लक्षात घेता पुढील वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येईल. नेहरू युवा केंद्र संगठनच्या वेबसाईटवर योजनेची सविस्तर माहिती आहे.  उमेदवार हा नांदेड जिल्हयातील रहिवासी असावा. उमेदवार ज्या तालुक्यातीत आहे त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कार्यालय पत्ता- नेहरू युवा केन्द्र नांदेड, मालेगाव रोड, शिवराय नगर, तरोडा नांदेड मो.क्र. ८९९९२८३७२६ याप्रमाणे आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...