Friday, December 10, 2021

 उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाविद्यालयीन व विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शिष्यवृत्ती नुतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधार कार्डवरील माहिती अद्यायावत केली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 29 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची सुविधा एनएसपी पोर्टलवर देण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास केंद्र शासनाकडून 15 डिसेंबर 2021 पर्यत अंतीम मुदतवाढ दिली आहे. तर महाविद्यालयांनी अर्जाची ऑनलाईन पडताळणी करण्यास अंतीम मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचे एनएसपी पोर्टलवरील अर्ज महाविद्यालयांनी आवश्यक असलेल्या कागदपत्राची तपासणी करुन अर्जावर विनाविलंब कार्यवाही करावी, असे  आवाहन उच्च शिक्षण नांदेड विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ग. वा. पाटील यांनी केले आहे. 

केंद्रशासन  पुरस्कृत  अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोष्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना,  महाविद्यालयीन व विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक  शिष्यवृत्ती योजना या तीन योजना ऑनलाईन पध्दतीने सन 2021-22  साठी राबविण्यात येत आहे. नांदेड विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या  जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यावसायिक महाविद्यालयातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात एनएसपी पोर्टलद्वारे केंद्रशासन  पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनांची ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येते, अशी माहिती उच्च शिक्षण विभागाने दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...