Sunday, August 14, 2022

 फाळणीतील वेदना अधोरेखित

करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

 

·  15 ऑगस्टपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- देशाच्या फाळणीमुळे लाखो लोकांनी झेललेले दु:खयातना या न विसरता येणाऱ्या आहेत. अनेकांनी यात बलिदान दिले. त्या ज्ञात-अज्ञात सर्व व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ आज 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळण्यात आला. फाळणीतील महत्वपूर्ण घटनांचे छायाचित्र व त्यासंदर्भातील माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी या उद्देशाने खास तयार करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ आज करण्यात आला.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरस्वातंत्र्य सैनिकांच्या वारसपत्नी व मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनीचे प्रातिनिधीक उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले.  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळेमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहानेनिवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णीउपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळेउपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरीउपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळेउपविभागीय अधिकारी विकास मानेजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस पत्नी सुमन त्रिंबकराव कुलकर्णीसिंधुबाई गगनराव देशमूखकस्तुराबाई श्रीकिशन पारीखयमुनाबाई मारोती कुरुडेसुंदराबाई मारोतराव देशमुखप्रभावती दत्तात्रय टेळकीकरसाधनाबाई रामराव पांडेकुमुदिनी राहेगावकरप्रेमलाबाई रामराव अंबुलगेकर यांना शाल श्रीफळ देवून गौरव केला. हे प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000


 








No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...