नांदेड,
दि.26:-
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय
नांदेड येथे संविधान दिन
साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित संविधानातील उददेशिकेचे
सामुहिक वाचन,संविधान व त्यासंबंधीत
वाचन साहित्याचे ग्रंथाचे प्रदर्शन
आयोजीत करण्यात आलेले होते. या ग्रंथ
प्रदर्शनाचे उदघाटन व संविधान
उददेशिकेच्या फलकाचे अनावरन विधी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास खाकरे
सर यांच्या हस्ते करण्यात
आले.
तसेच या कार्याक्रमास विधी
महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.राजीव वाघमारे
सर जिल्हा ग्रंथालय अधिकारी
श्री आ.अ.ढोक , श्री प्रताप
सुर्यवंशी व विद्यार्थी
व सभासद वाचकवर्ग उपस्थीत होते. या कार्यक्रमा
दरम्यान श्री खाकरे यांनी
उपस्थितांना संविधान व उददेशिकेचे
महत्व विषद करुन मार्गदर्शन
केले. तसेच 26/11 या भ्याड आंतकवादी हल्यामध्ये
शहीद जवानाकरिता दोन मिनीट
मौन पाळुन श्रध्दांजली देखील
वाहीली.
या ग्रंथ
प्रदर्शनामध्ये इंग्रजी व मराठी
भाषेमधील संविधानाच्या प्रती
तसेच संविधाननिर्मीती कालावधीत
त्यावर झालेले डीबेटस् याबददलची
महत्वाची माहिती देणारे ग्रंथ
उपलब्ध करुन देण्यात आलेले
आहेत. तरी सर्वांनी
त्याचा लाभ घ्यावा असे
आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी
नांदेड यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment