Tuesday, November 26, 2019


शाळास्तरावरील  स्मार्ट गर्ल प्रशिक्षण आयोजनाबाबत
सुचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे
नांदेड, दि. 26:- दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०१९ रोजी शाळा स्तर स्मार्ट गर्ल प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. स्मार्ट गर्ल प्रशिक्षणासाठी तालुकास्तरावर एका नोडल अधिकाऱ्यांची  नेमणुक करण्यात यावी.प्रत्येक शाळेतील शिक्षिका स्मार्ट गर्ल प्रशिक्षणासाठी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. 
शाळास्तरावर प्रशिक्षणासाठी विद्यार्थिनी संख्येच्या प्रमाणात वर्ग खोल्या,योग्य बैठक व्यवस्था, एल सी डी प्रोजेक्टर व इतर अनुषंगीक बाबी उपलब्ध करुन द्याव्यात या बाबतीत हलगर्जी करणाऱ्यावर
  योग्य ती कठोर कार्यवाही वरिष्ठ कार्यालयाकडे  प्रस्तावित करावी.सर्व  गटशिक्षणाधिकारी यांनी  तालुक्यातील आठवी ते बारावी मधील  एकही विद्यार्थीनी सदरील प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही या बाबत स्वत: खात्री करावी.
तालुका स्तरावरून तालुक्यातील सन्माननिय पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या भेटीचे नियोजन करुन भेट अहवाल दि ३० नोव्हेंबर, २०१९ रोजी प्रस्तूत कार्यालयात श्रीमती अवातिरक मॅडम यांच्याकडे सादर करावा, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
                                                                     0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...