प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै
नांदेड (जिमाका) दि. 9: प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गंत नांदेड जिल्ह्यासाठी इफको टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे. या योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले आहे. पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत गुरुवार 15 जुलै 2021 आहे. पिक विमा भरण्याच्या अंतिम मुदतीची वाट न बघता पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
आज इफको टोकीयो कंपनीच्यावतीने जिल्ह्यात प्रसार व प्रसिद्धीसाठी चित्ररथाचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी इफको टोकीयो हे उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment