Friday, November 19, 2021

 नांदेड जिल्ह्यात 5 लाख 88 हजार व्यक्तीची मधुमेह चाचणी 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मधुमेह दिवसाचे औचित्य साधून नांदेड जिल्हृयात 5 लाख 88 हजार व्यक्तींची मधुमेह तपासणी करण्यात आली. त्यापैकी 12 हजार  999 व्यक्तींना मधुमेह असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर मोफत औषध उपचार करण्यात आले. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये दररोज मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. 

मधुमेह होण्याची कारणे आणि लक्षणे तसेच रूग्णांना मधुमेह होवू नये किंवा झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच मधुमेह सप्ताह दिनानिमित्त 30 वर्षावरील व्यक्तींनी मधुमेह तपासणी करून घ्यावी, असे आवाहन  शल्य चिकित्सक डॉ.निलकंठ भोसीकर यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...